• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप-शिंदे गटाला धक्का! लोकसभेची आज निवडणूक झाल्यास ‘मविआ’ बाजी मारणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 27, 2023
in राजकीय
0
Spread the love

मुंबई : इंडिया टुडे आणि ‘सी-वोटर’ यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेक्षणात एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत देशातील जनतेचा सध्याचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी 2023 मध्ये गेल्या गेलेल्या या सर्व्हेमध्ये एकूण 1 लाख 40 हजार 917 जणांनी सहभाग घेतला होता. यात अनेक ज्वलंत मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत.

देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा, काँग्रेसला 68 आणि इतर पक्षांना 191 जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मतदानच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर भाजपाला 39 टक्के, काँग्रेसला 22 टक्के आणि इतर पक्षांच्या खात्यात 39 टक्के मतदान होऊ शकतं.

मविआला किती जागा मिळणार?

लोकसभेच्या आता निवडणूका झाल्यास महाराष्ट्राचा विचार केल्यास या सर्व्हेक्षणातून भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेसाठी सी-व्होटरने एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला एकूण 48 जागांपैकी (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) 34 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या 48 टक्के मतदान यूपीएच्या खात्यात जाऊ शकते. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे.

मोदी सरकारच्या कामावर जनता खूश

एनडीए सरकारच्या कामकाजावर 67 टक्के लोकांनी खूप चांगला असा शेरा दिला आहे आणि 11 टक्के लोकांनी चांगलं असं म्हटलं आहे. तर 18 टक्के लोकांनी वाईट असा शेरा दिला आहे. कोरोना काळात मोदी सरकारनं केलेलं काम सरकारचं आजवरचं सर्वात मोठं यश मानलं आहे. 20 टक्के लोकांनी मोदी सरकार कोरोना लढाईत यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. तर कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 17 टक्के, राम मंदिराच्या निर्माणाला 11 टक्के आणि जनकल्याण योजनांसाठी 8 टक्के लोकांनी मोदी सरकारचं सर्वात मोठं यश मानलं आहे.

मोदींवर सर्वाधिक विश्वास

पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. मोदींच्या नावाला 52 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 14 टक्के राहुल गांधी, 5 टक्के अरविंद केजरीवाल आणि 3 टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे. मात्र वाढती महागाई हे मोदी सरकारचं मोठं अपयश जनतेनं मानलं आहे. यासाठी 25 टक्के लोकांनी महागाईवर मतदान केलं आहे. तर बेरोजगारीच्या मुद्द्याला 17 टक्के, कोरोना महामारीशी झुंज 8 टक्के आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्याला 6 टक्के मतं मिळाली आहेत.

Tags: devendra fadanviseknath shinde
Previous Post

भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

Next Post

नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती; डॉक्टर मुलीची वडील आणि भावाने केली निर्घृण हत्या

Next Post

नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती; डॉक्टर मुलीची वडील आणि भावाने केली निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!