• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंदुकीच्या धाकावर मागितली खंडणी; भुसावळात तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 13, 2023
in Uncategorized
0
बंदुकीच्या धाकावर मागितली खंडणी; भुसावळात तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण
Spread the love

भुसावळ : रस्त्याने जाणाऱ्या चौघा तरुणांनी खंडणी न दिल्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून एकाच्या डोक्याला कट्टा लावण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील श्रीराम नगरात रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारी निखील राजपूतसह चौघांविरोधात खंडणीसह, आर्म अ‍ॅक्ट अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत रात्री उशिरा पसार झाले असून बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

बाजारपेठ पोलिसात तक्रारदार जय मनोज जाधव (वय 22, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास त्यांच्यासह मित्र अमर देविदास कसोटे, कुणाल राजू शिंदे व आकाश गणेश फबियानी आदी वाल्मीक नगर भागात गप्पा करीत होते व मित्र अमर कसोटेला सोडण्यासाठी दुचाकीने श्रीराम नगरात गेल्यानंतर दत्त नगर, हनुमान मंदिराजवळ संशयित निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांनी रस्ता अडवला.

पैसे न मिळाल्याने मारहाण…

अमर कसोटीचे गच्ची पकडून त्याच्या कानशीलाला कट्टा लावत पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने निखील राजपूतने यांच्याकडे पैसे नसल्याचे यांचे हातपाय तोडून टाका, असे सांगितल्याने अन्य संशयीतांनी लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. अमर व जय यांच्या डोक्याला लोखंडी रॉड मारण्यात आला तर अन्य दोघा मित्रांना पायावर रॉड मारण्यात आला तर या आकाश हा दुचाकी घेवून तिथून निसटण्यात यशस्वी झाला. मात्र आरोपींनी कुणाल राजू शिंदे याची दुचाकी (एम.एच.19 सी.डी.9308) ला रॉडने मारून तिचे नुकसान केले.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल…

या गुन्ह्याप्रकरणी जय मनोज जाधव (वय 22, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्या फिर्यादीवरून निखील राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधार्थ बाजारपेठ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

पुण्यातील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब हल्ल्याची धमकी; हैद्राबाद येथून तरुणास अटक

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू

Next Post
पाचोऱ्यात तरूणाची आत्महत्या; घरात कुणीही नसल्याचे पाहून घेतला गळफास

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!