मुंबई: नैराश्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अमेरिकन इंटरपोल एजन्सीच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हा तरुण ‘वेदनेशिवाय आत्महत्या करण्याचा उपाय’ गुगलवर शोधत होता. त्याच वेळी इंटरपोलने अमेरिकेतून मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच मुंबई पोलीस संबंधित तरुणाच्या घरी पोहोचले आणि त्याचे प्राण वाचवले. ही कथा कुठल्या
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मुंबईतील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी मुंबईत घर घेतले. त्यानंतर त्यांचे हप्ते सुरू झाले. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्याला पगार पुरेनासा झाला. त्यामुळे त्याने विविध वित्तीय संस्थांकडून महागड्या व्याजदराने कर्ज घेतले. या सर्वांचे हप्ते फेडताना त्याची तारांबळ उडत होती. एखाद्या ईएमआयला विलंब झाला तर वित्तीय संस्थांसह बँकेचे अधिकारी फोन करून त्रास द्यायचे.
अनेक दिवसांपासून आत्महत्येचा विचार
या सर्व अडचणीमुळे त्याला नैराश्य आले. त्यामुळे तो उदास राहू लागला होता. त्याच्या डोक्यात अनेक दिवसांपासून आत्महत्या करण्याचा विचार सुरू होता. त्याने गुगलवर “हाऊ टू सुसाइड विदाऊट पेन’ अशी माहिती सर्च केली. मात्र, अमेरिकेतून इंटरपोलच्या एका अधिकाऱ्याने हे पाहून मुंबई पोलिसांना लगेच कळवले.
पोलिसांनी असा शोधला तरुणाचा पत्ता
इंटरपोलने मुंबई पोलिसांना संबंधित तरुणाचे लोकेशन आणि आयपी अॅड्रेसची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी त्याच्यासह पालकांचे समुपदेशन केले आहे. त्याने यापूर्वी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आहे.