जळगाव : सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच ठिकाणी अमळनेर तालुक्यातील एका गावातील महिला गेलेल्या होत्या. त्याठिकाणाहून अमळनेरच्या दिशेने येत असतांना अपघातात पहाटेच्या सुमारास दोन महिला भाविक ठार झाल्या आहे तर तीन जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मिळालेल्या माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील दोन महिलाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर काही वेळातच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला भाविक सिहोर येथून रात्री १२ वा. निघालेले असतांना असतांना इंदौर हायवेवर जुलवानिया गावाजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे माहिती आहे. या अपघातात कमलबाई आत्माराम बिरारी, शोभाबाई लुकडू बिरारी या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.