यावल : शहरातील सुदर्शन चौकामध्ये एक तरुण हातात चाकू घेऊन दहशत माजवत होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने तत्काळ येऊन या तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुदर्शन चौकातील ताज पान सेंटरजवळ नदीम मोहम्मद ताहेर (वय २२) हा तरुण आपल्या जवळील धारदार चाकू बाळगून फिरत व दहशत माजवत होता. चाकूच्या भयाने सारे धास्तावले होते. याबाबत माहिती देताच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन नदीम ताहेर या तरुणाला ताब्यात घेतले.
तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
त्याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी गणेश मधुकर ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात हवालदार नरेंद्र बागुले करत आहे. दरम्यान या प्रकाराने काही काळ नागरिक भीतीच्या छायेत वावरले.