मुंबई : एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप असल्याने, Whatsapp स्कॅमर्सच्या रडारवर राहते. घोटाळेबाज Whatsappच्या माध्यमातून लोकांना फसवणुकीचा बळी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. स्कॅमर वापरकर्त्यांना अनेक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करतात. आता नवा घोटाळा ‘रु. 50 प्रति लाईक’ सुरू झाला आहे.
घोटाळेबाज लोकांना नोकऱ्यांबद्दल मेसेज पाठवतात अशी बातमी अलीकडेच आली होती. जेव्हा कोणी त्यांच्याकडून नोकरीची माहिती घेते तेव्हा ते यूट्यूब व्हिडिओ लाइक करण्यासाठी पैसे मिळवण्याविषयी बोलतात. स्कॅमर्सचा असा दावा आहे की यूट्यूब व्हिडिओला लाईक करून दररोज 5000 रुपये कमावता येतात.
नोकरीच्या मेसेजच्या नावाखाली घोटाळा
यासाठी घोटाळेबाज केवळ Whatsapp च्या माध्यमातूनच नव्हे तर लिंक्डइन आणि फेसबुकच्या माध्यमातूनही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घोटाळे करणारे प्रथम बनावट नोकऱ्यांबद्दल सांगतात. ते सांगतात की फक्त मर्यादित स्लॉट शिल्लक आहेत, जर त्यांना त्यासाठी अर्ज करायचा असेल तर ते आपली जागा रिजर्व करू शकतात.
पेमेंट ट्रान्सफरच्या नावाखाली खेळला जातो खेळ
युजर्सने मेसेजला रिप्लाय करताच, स्कॅमर त्यांना कॉल करतात आणि सांगतात की YouTube व्हिडिओ लाइक करण्यासाठी पैसे दिले जातील. लोकांना विश्वासात घेण्यासाठी ते सुरुवातीला काही रक्कमही देतात. विश्वास जिंकल्यानंतर, पेमेंट ट्रान्सफरमध्ये समस्या असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सुलभ पेमेंट ट्रान्सफरसाठी ऍप डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
फसवणूक टाळण्यासाठी घ्या खबरदारी
या ऍपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना सर्व आर्थिक माहिती मिळते. पासवर्डशिवाय ओटीपी आणि ईमेल सारख्या माहितीचाही यात समावेश आहे. ही फसवणूक टाळण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी तुम्हाला अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे लागेल.
स्कॅम मेसेजपासून सावध रहा
कोणत्याही अनोळखी नंबरवरून लॉटरी किंवा इतर स्कॅम मेसेजपासून सावध रहा. अज्ञात व्यक्तीने दिलेल्या लिंकवरून कोणतेही ऍप इन्स्टॉल करू नका. तुम्हाला कोणत्याही जॉब मेसेजबद्दल शंका असल्यास, तुम्ही थेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून शोधू शकता.