मुंबई: लखपती होण्यासाठी आपल्याला आयुष्यभर कष्ट करावे लागतात. मात्र कधीकधी योग्य वेळी घेतलेला आपला एक निर्णय आपल्याला अल्पावधीत लखपती बनवू शकतो. जर आपण टाटा समूहाच्या या कंपनीत सुरुवातीलाच गुंतवणूक केली असती, तर आज आपल्याला एक किंवा दोन टक्के नाही तर 58,000 टक्के पेक्षा परतावा मिळाला असता. म्हणजेच तुमची 1 रुपयाची गुंतवणूक आज 58,000 टक्क्यांनी वाढली असती.
आम्ही टायटन कंपनीबद्दल बोलत आहोत, ज्यांचा 1 जानेवारी 1999 रोजी 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यू असलेला शेअर फक्त 4.27 रुपयांचा होता. आता त्याची किंमत 2,500 रुपयांपर्यंत पोहचली आहे. टायटन ग्रुप कंपनीचे शेअर्स, जे टायटन ब्रँड आणि तनिष्क ब्रँड नावाच्या दागिन्यांचा व्यवसाय करीत आहेत. गेल्या 23 वर्षांत 58,000 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्याच वेळी, त्याने लाइफ टाइम हायमध्ये 2791 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
1 लाखातून बनले करोडपती
जर तुम्ही टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये 1999 मध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 25,000 शेअर्स मिळाले असते. जर सध्याच्या काळातील चढ -उतार पाहिल्यास, जरी या स्टॉकची किंमत 2500 रुपये स्थिर झाली असली तरीही तुमची 1 लाख रुपये गुंतवणूक आता 6,25,00,000 रुपये झाली असती. म्हणजेच, आपण आज फक्त 1 लाख रुपये गुंतवणूक करुन करोडपती झाले असते.
झुंझुनवाला यांनी कमावले 1,000 कोटी
राकेश झुंझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुंझुनवाला यांनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली आहे. सध्या रेखा झुंझुनवाला डिसेंबर 2022 पर्यंत टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेअर्स होते. जे कंपनीच्या सुमारे 5.17 टक्के भागभांडवल आहे. अलीकडेच, रेखा झुंझुनवाला यांनी या शेअर्समधून 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या महिन्याच्या 2 तारखेला टायटन शेअर्सचे मूल्य 2,310 रुपये होते. 16 फेब्रुवारी रोजी ते 2,535 रुपयांच्या किंमतीवर पोहोचले. अशाप्रकारे, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी प्रति शेअर 225 रुपये मिळवले. अशाप्रकारे त्यांचे एकूण उत्पन्न सुमारे 1000 कोटी रुपये होते.