जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जानेवारी ते 26 जानेवारी आगामी संघटनात्मक पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या पुढील दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिवसैनिक हा संघटनेचा प्राण आहे, त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी स्वतः जिल्हा परिषद गटनिहाय मतदार संघात जिल्हाप्रमुख निलेश पाटील आपल्या भेटीसाठी येत आहे. संघटनावाढी साठी शिवसैनिकांना बळ देणारा हा लक्षणीय दौरा आहे. या उपक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गट निहाय दौरा पुढीलप्रमाणे :
१. कानळदा – भोकर गट सकाळी 9 वाजता
२. म्हसावद – वावळदा गट – सकाळी 9 वाजता
३.शिरसोली – उमाळा – कुसुंबा गट – सकाळी 9 वाजता
४.नशिराबाद – भादली गट – सकाळी 9 वाजता
५.ममुराबाद – ईदगाव गट -सकाळी 9 वाजता