जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून भेट देण्यात येत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख आपल्या भेटीला हा आदर्शवत उपक्रम निलेश पाटील यांच्या माध्यमातून राबविला जात आहे. ग्रामीण भागातील जनतेकडून या दौऱ्यास प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
आगामी निवडणुका तसेच राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांचा जिल्हा परिषद गटनिहाय दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच जितेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण,शिवसेना युवा नेते शिवराज पाटील यांची उपस्थिती होती.
विकास कामांचा घेतला आढावा
निलेश पाटील यांनी रायपूर, कुसुंबा, चिंचोली, धानवड उमाळा, रामदेववाडी, कंडारी, शिरसोली या गावांमध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांची थेट भेट जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी घेतली असता त्यांच्या गावातील विकास कामा संदर्भातल्या समस्या तसेच संघटनात्मक बांधण्यासाठी करायच्या उपाययोजना यावर महत्त्वपूर्ण चर्चा केल्या जात आहे.
पक्ष संघटनात्मक बांधणीला वेग
आज या गावांमध्ये प्रत्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे यादरम्यान पुन्हा एकदा संघटना उभारणीसाठी कार्यकर्त्यांचा अधिक उत्साह बघायला मिळाला आहे निलेश पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेना उभारणीसाठी युद्ध पातळीवर बांधणी केली जात आहे यासाठी तळागाळातील सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या शिवसैनिकांची देखील चाचपने शिवसेनेकडून केली जात आहे.