जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ एका तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजकुमार प्रमोद मोरे (वय-१७) रा. हनुनमान नगर, मेहरूण जळगाव हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जून्या वादातून राजकुमार मोरे याला त्याच भागात राहणारे लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश नेरकर आणि मानस भरत भोई सर्व रा. मेहरूण, जळगाव यांनी मेहरूण येथील पोल्ट्री फार्मजवळ लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यानंतर राजकुमार मोरे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश नेरकर आणि मानस भरत भोई सर्व रा. मेहरूण, जळगाव यांच्या विरोधात रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.