जळगाव: शनिपेठ येथील रामदेवजी बाबा मंदिर येथून साधारणता ५० वर्षापासून भजन आणि होळीच्या फ़ाग महोत्सवाची सुरवात करण्यात आली. रामदेवजी बाबा मंदिरातील स्व. श्री श्रीकिसनलालजी सिखवाल यांनी सुरु केलेल्या या अखंडीत परंपरेला आजही नवी पीढी आधुनिक आणि उत्सावाने साजरा करतात.
फ़ाग महोत्सवाथील ६० ते ७० लोकांच्या समूह होळीच्या १५ दिवसांपासून ते होळीच्या नंतर पंचमीपर्यंत असे २० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी महोत्सव साजरा करतात. सोबत महत्वाच्या राजस्थानी वाद्य चंग, ढोलक आणि मंजीरा यातून निघणारी समधुर आवाज ते राजस्थानी गीतांपासून ते पारंपरिक लोगगीत सादर करतात. यावर्षी या उत्साहाला अथिक म्हणून मंडळातील सगळ्या सदस्यासाठी सारखे सांस्कृतिक ड्रेस बनवण्यात आले आहे. यासाठी यांना सर्वाची दाद मिळत आहे. यावर्षी १२ तारीख पर्यंत महोत्सव चालणार आहे असे मंडळाकडून कळवण्यात आले.