जळगाव: तालुक्यातील पिलखेडा गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीमधून विविध विकास कामांच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील कामांचा अनेक वर्षापासून अनुशेष भरून काढण्याचे काम मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. सुसज्ज ग्रामपंचायत व रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, जनार्धन पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, गोपाल पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख असलेले गुलाब वाघ यांच्यावर थेट बिगर शेपटीचा वाघ म्हणून टीका निशाणा साधला आहे. यामुळे राजकीय वाद ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा पेटण्याची शक्यता आहे.