भुसावळ : तालुक्यातील वांजोळा गावात नाल्याच्या काठावर हातभट्टीची दारू तयार करून बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक व तालुका पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई करीत अड्डा उध्वस्त करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, वाल्मिक सोनवणे, पो.ना. यासिन पिंजारी, पोहेकॉ रमण सुरळकर, पो.वा. विठ्ठल फुसे तसेच आरसीपी प्लॉटून अशांना रवाना केले.
आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
या पथकाने वांजोळा गावी नाल्याच्या काठावर गूळ, मोह, नवसागर मिश्रित कच्चे रसायने भरलेले ड्रम व एक प्लॅस्टिक कॅन भट्टीच्या बाजूस लपवून ठेवलेले तसेच हातभट्टी दारू नष्ट केली. संशयित आरोपी विजय सिताराम कोळी (वय ३२) राहणार वांजोळा याच्याकडून एकूण सतरा १७,१०० रुपयांची मुद्देमाल बाळगताना मिळून आला. म्हणून पोकॉ जगदीश भोई यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.