जळगाव : जळगावातील एका नामांकीत रुग्णालयातील सुरक्षारक्षक असलेल्या महिलेने अनैतिक संबंध ठेवावेत म्हणून हॉस्पीटलच्या सुपरवायझरने विनयभंग केल्याची संतापजनक घटना बुधवार, 8 मार्च रोजी घडली. या प्रकरणी संशयित खालीद अहमद बुर्हाणोद्दीन (जळगाव) विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
31 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या नामांकीत हॉस्पीटलमध्ये सुरक्षारक्षक असून संशयित सुपरवायझर खालीद अहमद बुर्हानोददीन काझी याने थम मशीनला थम करू दिले नाही. तसेच वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करीत मानसिक त्रास दिला. तसेच माझ्याशी संबंध ठेव नाही तर तुला मी कामावर ठेवणार नाही, असे बोलून पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी सुपरवायझर खालीद काझी विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक अलका शिंदे करीत आहेत.