पाचोरा : शहरातील मोंढाळे रोडवरील राहत्या घरात गळफास लावून 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दीपाली देविदास पाटील (वय 25, मोंढाळे रोड, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे.
मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली देविदास पाटील यांनी छताला गळफास घेतला. हा प्रकार लहान मुलाने पाहिल्यानंतर त्यांनी शेजारच्यांनी आपल्या पद्धत्तीने घटना सांगितली. माजी नगरसेवक बापु हटकर याबाबतची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील व रुग्णवाहिका चालक बबलु मराठे हे घटनास्थळी दाखल झाले.
पाचोरा पोलिसात नोंद
पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.