जळगाव: शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघ संघटनात्मक बांधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील अहोरात्र महिन्यात घेत आहेत. तळागाळातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना जोडण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्हा प्रमुख आपल्या दारी या उपक्रमास गावकऱ्यांचा तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा प्रतिसाद या मिळाला आहे.
यादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांचा यावेळी पक्षप्रवेश करण्यात येत असून अनेक आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास व सदस्य पदाधिकारी निलेश पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहे. जळगाव जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश पाटील यांनी जिल्हाप्रमुख आपल्या दारी या उपक्रमांतर्गत संपूर्ण जळगाव ग्रामीण मतदार संघ दौऱ्याच्या निमित्ताने ढवळून काढला आहे.
विकासकामांचा आढावा
जिल्ह्यात सुरू असलेले विकास कामे तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघात सुरू असलेली एकूण बाराशे कोटींची विकास कामे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयत्न याची सविस्तर माहिती दिली जात आहे. तसेच शासनाने अर्थसंकल्प दरम्यान केलेल्या घोषणा याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती या दौऱ्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे.
जिल्हाभरात संघटनात्मक मोठे फेरबदल
गावाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण या निमित्ताने गावातील महत्वपूर्ण प्रकल्प विकासासाठी हाती घेण्यात येणार असून ते लवकरच पूर्णत्वास येतील यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे
. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व आले आहे. जळगाव ग्रामीण तसेच जिल्हाभरात संघटनात्मक मोठे फेर बदल देखील करण्यात येणार आहे.
असा आहे दौरा
पाळधी-चांदसर जिल्हा परिषद गटातील झुरखेडा-निमखेडा येथे सकाळी ९ वाजता, पथऱाड बु. व खुर्द ९.३० वाजता, धार-शेरी -१० वाजता, चोरगाव -१०.३० वाजता, कवठळ- ११ वाजता, चांदसर- ११.३० वाजता, आव्हाणी- २वाजता, टाकळी-फुलपाट- २.३०वाजता, दोनगाव बु. व खु. ३ वाजता, रेल-लाडली- ४ वाजता, एकलग्न ५ वाजता, पोखरी-तांडा- ५.३० वाजता यानुसार दौरा राहिल.