जळगाव : शहरातील एका भागातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने एरंडोलच्या तरुणाने वारंवार अत्याचार केला व त्यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला तसेच नियोजित लग्नाच्या दिवशी वराकडील मंडळी न आणल्याने एरंडोलच्या तरुणासह तिघांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या एका भागातील शिक्षण घेत असलेल्या 18 वर्षीय तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 1 मे 2021 ते 12 मार्च 2023 या दरम्यान संशयित आरोपी हसन असलम मोमीन याने लग्नाचे आमिष दाखवत जवळीक निर्माण करीत फिर्यादीच्या घरी येत वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिली.
कॉफी, पपई खावू घालून गर्भपात केला
त्यानंतर हसनची आई मुन्नी व असलम मोमीन (रा.ईस्माल पुर, एरंडोल) यांनी कॉफी व पपई खावू घालून पीडीतेचा गर्भपात केला तसेच लग्नाची तारीख निश्चित केली मात्र संबंधित लग्नास न आल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तिघांविरोधात तक्रार दिल्यानंतर रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.