जळगाव: अमळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह सात पोलीस कर्मचारी व इतर 13 जणांविरुद्ध तीन दुकानदारांना बेकायदा पोलीस ठाण्यात दाबून ठेऊन खंडणी वसुली व दुकाने जामीनदोस्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाची प्रत स्वतः घेऊन जाऊन एलसीबीकडे देऊन त्यांना अमळनेर येथे येऊन गुन्हा दाखल करण्यास सांगावे, असे आदेश न्यायाधीश चौधरी यांनी शुक्रवारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर सरकारी वकिलांना दिले आहेत.
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे अमळनेर पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना त्यांनी बस स्थानकाच्या जवळील खाजगी जागेवरील दुकानदारांना 9 मार्च 2022 रोजी बेकायदेशीरपणे 28 तास डांबून ठेवून त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याबाबत न्यायालयात पीडित व्यापारांचे वकील ॲड नितीन भावसार यांनी खटला दाखल केला होता. त्यावर गुरुवारी न्यायालयाने निकाल दिला होता. याप्रकरणी भादवि कलम 156 (3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
LCBच्या देखरेखित गुन्हा दाखल करावा
तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या देखरेखित केला जावा असे नमूद केले होते न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निकाल दिला 22 पानी आदेश दिले आहेत. त्याची अधिकृत प्रत न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड होणे बाकी आहे. न्यायालयाने या निकाल प्रतिवर शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सरकारी वकील एडवोकेट बागुल यांना आदेशाची एक प्रत स्थानिक गुन्हे शाखेला स्वतः जाऊन द्यावी त्यांना अमळनेर येथे येऊन गुन्हा दाखल करण्यास सांगावे असे सांगितल्याची माहिती पीडित व्यापारांचे वकील ऍड नितीन बाविस्कर यांनी दिली आहे.