केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट ब, गट क कर्मचारी निवडण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. भारतात सर्वांत जास्त सरकारी रोजगार उपलब्ध करून देणारा सरकारी आयोग अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँकेच्या परीक्षांच्या मानाने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सोपी आहे व पदसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करावी.
उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतील लाखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने या पदांबद्दल, या परीक्षांबद्दल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधील महाराष्ट्रातील उमेदवारांचा सहभाग व यश हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय सरकारी खात्यांमध्ये मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ११ अंतर्गत ५३६९ रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. ही भरती १० वी, १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २७ मार्चपर्यंत करायचा आहे. निवड पोस्ट ११ ची परीक्षा जून किंवा जुलै २०२३ मध्ये घेतली जाईल.
पदाचे नाव
१) सीनिअर टेक्निकल असिस्टंट
२) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
३) चार्जमन
४) लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट
५) फर्टिलाइजर इन्स्पेक्टर
६) कँटीन अटेंडंट
७) हिंदी टायपिस्ट
८) इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
९) लायब्ररी अटेंडंट
१०) सीनिअर सायंटिफिक असिस्टंट
वयाची अट
१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता
– १० वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण- मॅट्रिक लेवल पदासाठी
– १२वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण -इंटरमिजिएट लेवल पदासाठी
– भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी- बॅचलर पदवी पदासाठी
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२७ मार्च २०२३
संगणक आधारित परीक्षा :
जून, जुलै २०२३