जळगाव : जिल्ह्यातील पाळधी येथे धार्मिक कार्यक्रमात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचं सांगितले जात आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गाव असलेले पाळधी येथेन आज धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात गावातील भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात मिरवणूक सुरू असतानाच काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी पुढील मोहीम हाती घेतली आहे. याबाबत पुढील तपास जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.