जामनेर : तालुक्यातील पळासखेडा गुजराचे येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 15 हजारांच्या रोकडसह दोन लाख 31 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अरुण त्र्यंबक मोयके (42, पळासखेडा गुजराचे) हे परीवारासह वास्तव्यास असून शेतमजुरी करीत उदरनिर्वाह करतात. मोयके परीवारातील सदस्य शनिवारी सकाळी कामाला गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी सकाळी 11.30 ते दुपारी 2.15 दरम्यान साधली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 15 हजारांची रोकड व दोन लाख 16 हजारांचे दागिणे असा एकूण दोन लाख 31 हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोयके यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार साहिल तडवी करीत आहेत.


