• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खड्ड्यात मासे, अन… वाहिली श्रद्धांजली… राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 28, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
खड्ड्यात मासे, अन… वाहिली श्रद्धांजली… राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन.
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मेहरूण परिसरात गेल्या वीस दिवसांपासून अमृत योजनेच्या अंतर्गत काम सुरु होते. त्यात परिसरातील शेरा चौकात दोन भले मोठे खड्डे करून ते तेव्हापासूनच उघडे पडून होते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदन देण्यात येत होते. पण संबंधित नगरसेवक व अधिकारी त्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणून आज राष्ट्रवादीचे साहिल पटेल यांनी अनोखे आंदोलन केले.

शेरा चौक हा मेहरूण मधील मोठा रहदारीचा भाग आहे, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरासह इतरही ठिकाणी अमृत योजनेचे काम संथगतीने सुरु आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल हे सुरूच आहे. मेहरूण येथील शेरा चौकात गेल्या वीस दिवसापासून अमृत योजनेच्या कामानिमित्त पाईपलाईनसाठी दोन खड्डे केले होते. पण त्याचे कामही पूर्ण होत नसल्याने नागरिक अपघाताच्या भीतीच्या सानिध्यात जगत होते. त्या खड्ड्यांना बुजवण्यासाठी नागरिकांनी संबंधित नगरसेवक व अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार व निवेदन दिले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यासाठी आज राष्ट्रवादीचे साहिल पटेल यांनी आंदोलन करण्याचे ठरवले असता. संबंधित एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान तेथे आले. त्यांनी खड्डे माती टाकून बुजवण्याचे काम सुरू केले. एक खड्डा बुजवल्या नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाईपलाईन न तक्ता खड्डे का बुजवता असा सवाल केला. व दुसऱ्या खड्ड्यात कार्यकते उतरले आणि त्यात पाणी व मासे टाकले. त्याच बरोबर काम पूर्ण न कर्ता बुजवलेल्या खड्ड्यावर गुलाबाची फुलं वाहून राष्ट्रवादीचे साहिल पटेल, डॉ. रिजवान खाटीक, रिजवान जहागीरदार, नबील शेख, रफिक शेख, हाशिम पटेल, महमूद शेख, जाहिद शाह, यांनी श्रद्धांजली देऊन अनोखे आंदोलन केले.

 

Tags: abhijit raut jalgaonamrut yojanajalgaon rashtrawadirashtrawadi congresssahil patel
Previous Post

लग्न करणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती पण… ; एकनाथराव खडसे…

Next Post

त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

Next Post
त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!