जळगाव : दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हानं मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. संजय राऊतांनी खासदारकीला आमची 41 मते घेतली आहेत. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही आणि ते देणारही नाहीत असे पाटील म्हणाले.
ज्यानं शिवसेना फोडली त्याच्यावर आमचा राग
काल झालेल्या पाचोऱ्यातील सभेत राऊत काय बोलले आपल्याला माहिती आहे. ते फक्त गुलाबो गॅंग बोलले आणि खाली बसले. कुठलंही व्हिजन नसलेलं काम त्यांनी केलं आहे. उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचा राग नाही. पण जो माणूस ज्याने शिवसेना फोडली त्याच्या बाबतीत आमचा राग असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. मला तरी वाटतं त्या माणसाच्या कानात सांगितलं असेल की शांत राहा. याच्यामुळे संजय राऊत यांनी तीन मिनिटात त्यांचे भाषण संपवल्याचे पाटील म्हणाले.
राजीनामे तयार ठेवा सांगणारे संजय राऊत कोण?
आमचे राजीनामे तयार ठेवा असं सांगणारे संजय राऊत कोण आहेत. आमच्या मतावर मोठे झालेली ही लोक आहेत. आमची 41 मते त्यांनी घेतली आहेत. त्यामुळं उलट आम्ही म्हणतोय संजय राऊतांनीचं राजीनामा द्यावा असे राऊत म्हणाले. आधी चुकीच्या गोष्टी बोलणं आणि नंतर नामर्द म्हणणं हे कुठपर्यंत चांगलं आहे. भाषणाची तुलना करा आपण काय वाक्य वापरतो आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याने आमच्या प्रतिमेला कुठलाही धक्का लागणार नाही असेही पाटील म्हणाले.