• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांना सुवर्णसंधी! पर्यटन महामंडळात मिळणार दरमहा 40 हजाराची फेलोशिप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 2, 2023
in Uncategorized
0
तरुणांना सुवर्णसंधी! पर्यटन महामंडळात मिळणार दरमहा 40 हजाराची फेलोशिप
Spread the love

मुंबई : राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला असून, पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहे. शिवकालीन गड-किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तूंसह विविध धार्मिक शहारांमुळे पर्यटन क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तरुणांसाठी फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इच्छूकांनी 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, पर्यटन पायाभूत सुविधा यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे.

जाणून घ्या आवश्यक पात्रता

वयोमर्यादा: या फेलोशिपसाठी 21 ते 26 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.

शिक्षण: कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक, तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

दर महिना 40 हजाराची फेलोशिप

निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपये छात्रवृत्ती आणि 5 हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

अर्ज कुठे करायच?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

संपुर्ण माहिती तपासा

अधिक माहितीसाठी www.mtdc.co या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

Previous Post

केंद्र सरकारची मोठी कारवाई; 14 मेसेंजर ॲप्सवर बंदी, दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता वापर

Next Post

WhatsApp चॅट्स लीक होण्याचा धोका! अशा प्रकारे करा लॉक, जाणून घ्या संपूर्ण सेटींग

Next Post
व्हॉट्सॲपच भन्नाट फीचर; युजर्संना होणार मोठा फायदा, जाणून घ्या विशेषत:

WhatsApp चॅट्स लीक होण्याचा धोका! अशा प्रकारे करा लॉक, जाणून घ्या संपूर्ण सेटींग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!