• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! शरद पवार घेणार राजकीय संन्यास; राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 2, 2023
in Uncategorized
0
…तर राष्ट्रवादीच्या ताब्यातून बारामतीही जाणार?; शिवसेना नेत्याचा शरद पवारांवर पलटवार
Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. पवार म्हणाले की, राष्ट्रवादीची जबाबदारी आता दुसऱ्याने घ्यावी असे मला वाटते. मी अनेक वर्षे पक्षाची जबाबदारी सांभाळली असून आता पक्षाचे नेतृत्व करायचे नाही. जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील, पण पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचे आहे, असे ते म्हणाले.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता पवार अध्यक्षपद कोणाकडे सोपवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्याकडेही प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. अशा स्थितीत पक्षाध्यक्षपदाची लढाई आगामी काळात रंजक ठरू शकते.

संघटनेत बदलाचे यापूर्वीच दिले संकेत

याआधी गेल्या आठवड्यात पवारांनी मुंबईत आयोजित युवा मंथन कार्यक्रमात भाकरी फिरवण्याबाबत बोलले होते. पवार म्हणाले, ‘मला कोणीतरी सांगितले की, भाकरी योग्य वेळी फिरवावी लागते आणि ती योग्य वेळी न फिरवली तर ती करपते. आता भाकरी फिरवण्याची योग्य वेळ आली आहे, त्यात उशीर होता कामा नये. या संदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावर काम करण्याची विनंती करणार आहे. पवारांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नव्या राजकीय वाटचालीबाबत अटकळ बांधली जात आहे. ते भाजपशी हातमिळवणी करू शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र, अजित पवार यांनीही याचे खंडन केले आहे.

पुतण्या किंवा मुलीकडे पक्षाची धुरा सोपवणार

युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार यांनी आपली बाजू मांडली. अशा परिस्थितीत आता पवारांना पक्षाची जबाबदारी काही नव्या पिढीच्या हाती द्यावीशी वाटण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन मोठी नावे आहेत. पहिली त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि दुसरे त्यांचे पुतणे अजित पवार. अलीकडच्या काळात अजित पवार यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार या दोघांपैकी एकाकडे पक्षाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे. यातून त्यांना तरुणांमध्ये संदेश द्यायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना संधी असून राष्ट्रवादी तरुणांना पुढे घेऊन जाते.

Previous Post

ती मीच होती, ‘त्या’ रात्री भाजप नेत्यासोबत असलेल्या महिलेचा खुलासा

Next Post

जामनेरमध्ये वादळीवाऱ्यांसह गारपिटीचा कहर; साडेपाचशे मेंढ्या जागीच ठार

Next Post
जामनेरमध्ये वादळीवाऱ्यांसह गारपिटीचा कहर; साडेपाचशे मेंढ्या जागीच ठार

जामनेरमध्ये वादळीवाऱ्यांसह गारपिटीचा कहर; साडेपाचशे मेंढ्या जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!