• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात मेडिकल दुकानावर चोरट्यांचा डल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2023
in Uncategorized
0
अमळनेरात दरोड्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी केली एकास अटक, सहा जणाविरोधात गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव: शहरातील वर्दळीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रस्त्यावर एक मेडिकल औषधांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच ते दहा हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवार दि. १६ मे रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

फरदीन शेख यांचे जिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक ३ समोर एस. एन. फार्मा हे मेडिकल औषधांचे दुकान आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकान सुरू केले आहे. सोमवारी दिनांक १५ मे रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या जागेच्या मालकाने फरदीन शेख यांना फोन करून दुकानाचे शटर वाकलेले अवस्थेत असल्याची माहिती दिली.

पोलिसांना दिली माहिती

त्यामुळे फरदीन शेख हे तातडीने दुकानाकडे आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. दरम्यान चोरीची घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये संशयित चोरटे दुकानाचे शटर वाकवून आत मध्ये शिरताना व चोरी करताना तसेच बाहेर जाताना दिसत आहे. त्यावरून चोरटे हे सराईत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. फरदीन शेख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वर्दळीच्या रस्त्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर चोरट्यांनी दुकान फोडीचा प्रयत्न केल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

धोका वाढणार! या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाकडून अलर्ट

Next Post

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार, तीन गंभीर जखमी

Next Post
मुक्ताईनगरात भीषण अपघात : मोटरसायकलच्या धडकेत दोघे तरुण ठार

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार, तीन गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!