• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2023
in Uncategorized
0
प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित
Spread the love

जळगाव : खाजगी वाहतूकदारांनी स्पर्धात्मक वातावरणात वाजवी भाडे आकारुन प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तथापि, गर्दीच्या हंगामात मागणी पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होवू नये याउद्देशाने कमाल भाडे निश्चित करण्यात आलेले आहे. कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबधित परवानाधारक वाहतूकदाराविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन दिला असून प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याबाबतचा फलक लावण्याची सूचनाही दिली आहे. तसेच कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणीची विशेष मोहिम 16 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.

असे आहेत दर

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या येणा-या भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर गृह विभागाने 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स यांनी शासन निर्णयानुसार आकारावयाचे महत्तम प्रति प्रवासी, प्रति किमी दर-नॉन एसी सिटर (निमआराम)-2.56 रुपये, एसी सिटर-4.62 रुपये, नॉन एसी स्लिपर-2.95 रुपये, एसी स्लिपर-5.49 रुपये असे आहेत. त्यानुसार पुणेसाठी अनुक्रमे-999, 1803, 1150, 2141, मुंबईकरीता-1101, 1987, 1268, 2361, नागपूरकरीता-1123, 2033, 1298, 2416, अहमदाबादकरीता-1485, 2380, 1711, 3184, इंदौरकरीता-794, 1432, 914, 1702 तर सुरतकरीता-794, 1478, 944, 1757 याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहे.

याठिकाणी करा तक्रार

कोणत्याही खाजगी वाहतूकदाराने (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास याबाबतची तक्रार [email protected] व [email protected] या संकेतस्थळावर करावी. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

15 वर्षांनंतर भारताला मोठे यश; मुंबई हल्ल्यातील आरोपीच्या प्रत्यार्पणास युएस कोर्टाची मंजुरी

Next Post

जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डल्ला; दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लांबविला

Next Post
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्याचांदीचे दागिने केले लंपास

जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डल्ला; दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!