• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकमेकांवर अंडी फेकता-फेकता पेटला वाद; दोन गटात दगडफेकीत दोन जखमी, पाच जणांना अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 19, 2023
in Uncategorized
0
जळगावात तरुणाला बेदम मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव : वाढदिवस साजरा करताना अंडी फेकण्याच्या मस्करीतून झालेल्या वादानंतर दोन गटात हाणामारी झाली. एमआयडीसी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांच्यावर दंगलखोरांनी दगडफेक केल्याने दोघे कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना २३ पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मासूमवाडीत राहणाऱ्या जिशांत ऊर्फ दिशू युनूस शिकलीकर याचा वाढदिवस होता. डायमंड हॉलजवळ सर्व मित्र वाढदिवस साजरा करत असताना काहींनी एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरुवात केली. हातात अंडी घेऊन ते एकमेकांच्या मागे पळत असताना ते सम्राट कॉलनी परीसरात पोहोचले. यावेळी गोंधळ उडाल्याने दुसर्‍या समुदायातील लोकांनी आक्षेप घेत पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. याचा राग आल्यामुळे जिशांतसह त्याच्या मित्रांनी थेट लोकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. एमआयडीसीचे कर्मचारी छगन तायडे, किरण पाटील व ललित नारखेडे घटनास्थळी आल्यानंतर तरुणांनी थेट पोलिसांवरच दगडफेक केल्याने तायडे व किरण पाटील जखमी झाले तर दंगलखोरांनी चार वाहनांचीही तोडफोड केली. पोलिसांनी सुमारे २५ जणांवर स्वत: फिर्याद देऊन दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याचा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारचा मुहूर्त ठरला? कोणत्या तारखेला होणार विस्तार, कोणाला मिळणार संधी

Next Post

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

Next Post
प्रवासाचा बेत आखताय! आधी ही बातमी वाचा, अन्यथा होणार खोळंबा

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!