• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्लॅक, ग्रीन किंवा कडक चहाचा घ्या आस्वाद; अन् जाणून घ्या आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा इतिहास…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2023
in Uncategorized
0
ब्लॅक, ग्रीन किंवा कडक चहाचा घ्या आस्वाद; अन् जाणून घ्या आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा इतिहास…
Spread the love

मुंबई : 21 मे हा चहा प्रेमींसाठी एक आवडता दिवस आहे कारण तो चहाला समर्पित आहे. दरवर्षी हा दिवस त्याचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. चहाचा इतिहास, उत्पादन, वापर आणि आरोग्य फायद्यांसह चहाच्या विविध पैलूंबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. याशिवाय हा दिवस चहाचे जागतिक महत्त्व दर्शवतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व.

आंतरराष्ट्रीय चहा दिवस दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे.

कधीपासून साजरा केला जातो चहा दिवस

आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचा इतिहास चीन, भारत, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. याव्यतिरिक्त टांझानिया, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते. भारताने 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड ॲन्ड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचा विचार घेऊन 21 मे हा जागतिक चहा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला.

चीनमध्ये पहिल्यांदा चहाची शेती

चहा जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाण्याऱ्या पदार्थापैकी चहा एक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची चहा बनवण्याची पध्दत वेगळी असते. कुणाला आलं घालून चहा प्यायला आवडतं तर कुणाला ब्लॅक टी प्यायला आवडतो. जगात चहाची शेती सर्वप्रथम चीनमध्ये करण्यात आली होती. यामागे एक कथा प्रचलित आहे. एकदी चीनचा सम्राट शेनॉन्ग त्याच्या बागेत बसून चहा पित होता. त्यावेळी एक पान त्या उकळत्या पाण्यात येऊन पडलं. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला आणि त्याला वेगळा सुगंधही आला. चीनच्या सम्राटाला त्याची चव खूप आवडली. त्यानंतर चहाचा शोध लागला असं चीनमध्ये सांगितलं जातं.

चहाचं भारतात आगमन

म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागात 1824 सालच्या दरम्यान चहाचे पानं सापडली. त्यानंतर इंग्रजांनी 1836 सालापासून चहाचे उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला. भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केलं जायचं. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिध्द आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यातक आहे. भारतातही चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं पण स्थानिक स्तरावर त्याचं सेवनही मोठ्या प्रमाणात केलं जातं. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं.

चहाचे फायदे

चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक ॲसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन (कॅफिन, थिओफिलाइन आणि थियोब्रोमाइन) हे घटक असतात. हे शरीराला फायदेशीर असतात. चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरात शक्तिशाली ॲन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.

Previous Post

5 तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे यांना धक्का देणारी मोठी बातमी

Next Post

शहर असो किंवा गाव बँकेत न जाता बदलता येणार 2000 च्या नोटा, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Next Post
खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने या नियमात केला बदल

शहर असो किंवा गाव बँकेत न जाता बदलता येणार 2000 च्या नोटा, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!