• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 14, 2023
in जळगाव
0
Spread the love



महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल राज्यांच्या वरिष्ठ महिला संघांचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत असतील. जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जाईल. या स्पर्धेत प्रत्येक सामना हा २० षटकांचा असेल व तो साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. प्रत्येक संघाशी दोनदा लढत देईल. व स्पर्धेतील गुणतालिकेतील प्रथम दोन संघात अंतिम लढत होईल. या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वात्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उदघाटन दि. १५ सप्टेंबर ला सकाळी ८.३० वाजेला अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होईल. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सील सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे (परभणी), अॅपेक्स कौन्सील सदस्य राजेंद्र काणे (जालना), जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व युसूफ मकरा, सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे व कार्यकारिणी सदस्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९ वाजेला रंगेल. तर दुपारी १ वाजेला तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात होईल.

अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.

Tags: #jain irregationcriketjalgaonjalgaon city
Previous Post

एकनाथ खडसे लढले तरी रक्षा खडसे दोन लाख मतांनी निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा ; मानाचा पोळा फुटला

Next Post

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा ; मानाचा पोळा फुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!