• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2023
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा – भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदनेने झाली. गुरुवंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे प्रांत श्री. महेश सुधळकर, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, डॉ. राजेंद्र फडके व उद्योजक श्री. किरण बेंडाळे यांच्याहस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डाॕ. राजेंद्र फडके, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले. तर कलावंतांचे स्वागत प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. दीपिका चांदोरकर,प्रा. शरद चापेकर यांनी केले. या कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी व निमिश कैकाडी यांचा सहभाग होता. तर साथसंगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) यांनी केली.

कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन सौ. शुभदा दादरकर यांचे होते, आणि सुरू झाला नाट्यपदांचा एक अविरत झरा.
कार्यक्रमाची सुरुवात “सप्तसूर झंकारती बोले” या जय जय गौरीशंकर नाटकातील नांदी ने झाली. त्यानंतर ज्ञानेश पेंढारकरांनी जय जय गौरीशंकर नाटकातील “रमा रमण श्रीरंग” हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले पद गायले त्यानंतर पंडित राज जगन्नाथ नाटकातील “मदनाची मंजिरी साजिरी” हे नाट्यपद सादर केले संगीतभूषण पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “कोण असशील तू न कळे” हे पद सादर केले त्यानंतर सौ. नीलाक्षी पेंढारकर यांनी पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “सोहम हर डमरू बाजे” तसेच मदनाची मंजिरी नाटकातील प्रभाकर भालेकरांनी संगीतबद्ध केलेले “अंग अंग तव अनंग” व “ये मौसम है रंगीत” या नाट्यपदाने तर कहरच केला. त्यानंतर मैफिलीमध्ये आला नवा दमाचा गायक निमिश कैकाडी निमिशने पंडितराज जगन्नाथ नाटकातील गाजलेलं पद “सावन घन गरजे” गरजे हे नाट्यपद सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्याच नाटकातील “जय गंगे भागीरथी” या नाट्यपदाने तर कमालच केली. त्यानंतर शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातील “जय जय कुंजबिहारी” नाट्यगीत सादर केले अशीच एक तरुण आश्वासक गायिका म्हणजे प्राजक्ता जोशी छोटा गंधर्वांनी संगीतबद्ध केलेल्या सुवर्ण तुला नाटकातील “कोण ही सुंदरा” हे नाट्यपद प्राजक्ताने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर जय जय गौरीशंकर नाटकामधील “नारायणा रमा रमणा” हे अत्यंत गाजलेलं नाट्यपद अत्यंत ताकतीने प्राजक्ताने सादर केले आणि रसिकांचे कान तृप्त केले मदनाची मंजिरी नाटकातील “ऋतुराज आज वनी आला” या नाट्यपदाने या विद्याधर गीतरंग रजनी ने कळसच गाठला. या सर्व गायकांमध्ये आपल्या जळगावचे एक अत्यंत हरहुन्नरी असे कलाकार डॉ. राजेंद्र फडके यांनी उत्स्फूर्तपणे एक नाट्यपद सादर करण्याची विनंती केल्याने त्यांनाही या निमित्ताने व्यासपीठाची सेवा करण्याचा योग आला. त्यांनी “रती हुनी सुंदर मदनमंजिरी” “हरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती शामला” ही दोन नाट्यपदे सादर करून मैफिलीत रंग भरले. ही नाट्यपद सादर करून डॉकटर मधला कलाकार तमाम जळगावकर रसिकांना दाखवून दिला.

विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाची सांगता बावनखणी नाटकातील पंडित यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेली रचना सर्व कलावंतांनी मिळून सामूहिक रित्या गायली आणि ती रचना होती “होलीकोत्सव गीताची”. या गीताने विद्याधर गीत रंग सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमास तितकीच दमदार साथ धनंजय पुराणिक व तरुण आश्वासक कलावंत वरद सोहनी यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी तर सूत्रसंचालन सौ दीपिका चांदोरकर यांनी केले

Tags: #jain irregationashok jainkantai faundeshan
Previous Post

खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक

Next Post

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!