• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2023
in कृषी, जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा – जागतिक कापूस दिना निमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कापूस हे आपल्या राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे, ४२ लाख क्षेत्रावर कापसाचे पिक घेतले जाते, उत्पादकता खुप कमी हेक्टरी ३३६ किलो रूई आहे. त्याचप्रमाणे राज्यात सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असुन उत्पादकता कमी आहे.

त्यामुळे कापुस पिकाची उत्पादकता वाढविण्याची खुप आवश्यकता आहे, उत्पादकता आणि बाजारपेठ विचार करावा. जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि उत्पादकता वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली व जैन ठिबक वरील कापूस पिकास भेट दिली

पिकामध्ये गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरीता वापरण्यात करण्यात आलेल्या जपानी पीबी नॉट तंत्रज्ञान बाबत जैन इरीगेशन चे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी डी जडे ह्यांनी माहीती दिली, ह्या तंत्रज्ञानाचे निष्कर्ष खुप चांगले आहे व शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. कृषी संशोधन केंद्र ममुराबाद चे कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी ह्यांनी जागतिक कापूस दिनाचे महत्व, त्याचा उद्देश ह्यावर माहीती दिली, कापूसतज्ञ डॉ.संजीव पाटील ह्यांनी कापसाचे वाण निवडीचे निकष, लागवड अंतर, झाडांची संख्या तसेच कापूस पिकातील व्यवस्थापना बाबत मनोगत व्यक्त केले.

डॉ.बी डी जडे ह्यांनी कॉटन मिशन २.० मध्ये कापूस पिकाचे उत्पादन कसे मिळवावे तसेच कापूस लागवड गादी वाफा, मल्चिंग फिल्म, ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला. उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा रमेश जाधव ह्यांनी कृषी विभागाच्या योजना विषद केल्या. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाड चे प्रगतीशील शेतकरी संजय दशरथ पाटील होते त्यांनी कापूस शेतीतील अनुभव सांगीतले. कार्यक्रमा करीता जैन इरीगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, विक्री अभियंता मनोज पाटील, जैन ठिबक वितरक दिनेश पाटील, अजय पाटील, सुशांत चतुर, पी के पाटील, देवेंद्र पाटील आणि परीसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिर्थराज इंगळे सरांनी केले.

Tags: jalgaonjilhadhikari aayush prsadkapus parishdkapus utpadan
Previous Post

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

Next Post

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण

Next Post

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!