• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३० कोटीचे प्रकरण ; अद्वय हिरे नेमके कोण ? चर्चांना उधान..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 16, 2023
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

नाशिक राजमुद्रा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी अद्वय हिरे भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले. नाशिक जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा शिलेदार म्हणून पुढे आलेल्या अद्वय हिरे यांना अटक झाल्याने अनेक राजकीय तर्क लावली जात आहे.

शिवसेनेचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री भोपाळ मधून अटक करण्यात आली आहे आठ वर्षापूर्वी एका जुन्या प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या कर्जावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादात त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक मध्ये राजकीय कोडी करण्यासाठी व ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी अद्वय हिरे यांना नेमकी अटक करण्यात आली आहे का ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

अद्वय हिरे नेमके कोण ?
अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर दादा भुसे शिंदे गटासोबत राहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना ठाकरे गटात घेऊन दादा भुसे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांचे कट्टर विरोधक ते आहेत. त्यांना शिवसेनेचे उपनेते करण्यात आले. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे

रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना भोपाळ मधून अटक करण्यात आली, या गिरणी साठी एकूण साडेसात कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतले होते हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा हिरे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. हिरे यांच्या अटकेवर त्यांच्या समर्थक आक्रमक झाले आहे. राजकीय कोंडी करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप  करण्यात आला आहे. हिरे यांना रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात.  रेणुका सूतगिरणीकडून  साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मंत्री दादा भुसे यांच्यासमोर अद्वय हिरे यांना उभे टाकले जाणार अशीच राजकीय चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहे.

काय आहे प्रकरण ?
जिल्हा बँकेची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर 32 कोटींची थकबाकी आहे. कर्ज घेताना बँकेची दिशाभूल करुन कर्ज घेतल्याचा आरोप अद्वय हिरे यांच्या वर करण्यात आला आहे. या प्रकरणात मालेगाव तालुक्यात असलेल्या रमझानपुरा पोलिसांत 29 जणांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आठ वर्ष जुने आहेत. याबाबत कायदेशीर तिढा सुरू होता, न्यायालय मध्ये हिरे यांनी धाव घेतल्यानंतर त्यांचा मात्र जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Tags: advy hire nashikadvy hire renuka sutagiranicraimnashiknashik police
Previous Post

रखवालदाराचा खून करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

जळगांव जिल्ह्यात राजकीय खळबळ ; अनिल पाटलांची राजकीय अडचण होणार का ?

Next Post

जळगांव जिल्ह्यात राजकीय खळबळ ; अनिल पाटलांची राजकीय अडचण होणार का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!