• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जळगांव जिल्हा श्री’ २०२४ जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 15, 2024
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा |  महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मराठी भाषिकांचे एकमेव पुरस्कर्ते हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक २० वी ‘जळगांव जिल्हा श्री’ २०२४ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी २०२४ रोजी जळगांव येथील श्री साईबजरंग जिमचे पटांगण, नवीन पिंप्राळा उड्डाण पुल जवळ, राधाकृष्ण नगर छत्रपती शिवाजी नगर जळगांव या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासुन प्रकाश झोतात भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.

जळगांव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक २० वी ‘जळगांव जिल्हा श्री’ २०२४ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे –

वजन गट- भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियमाप्रमाणे ० ते ५५ कि.ग्रॅम, ५६ ते ६०कि.ग्रॅम, ६१ ते ६५ कि.ग्रॅ., ६६ ते ७० कि. ग्रॅम वरील असे एकुण ४ वजनी गट राहतील.

विजयी स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात येईल १ ते ५ क्रमांकास रोख रक्कम तसेच स्मृतिचिन्ह, व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल. एकमेव विजयी स्पर्धकास ‘बाळासाहेब ठाकरे चषक २०२४’ रोख रक्कम रू.११०००/- देण्यात येईल. तसेच बेस्ट पोझर रू.५००१/-, मोस्ट इम्प्रुव्हड रू. ३००१/- तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल.

स्पर्धेच्या निमित्ताने भव्य रंगमंच ३०x४५ फुटाचे राष्ट्रीय स्तराचे स्पर्धेकरीता वापरण्यात येणारे भव्य रंगमंच डिजीटल स्क्रीन, विशिष्ट प्रकारचे प्रकाश संयोजन, उच्च प्रतिचे साऊंड सिस्टीम्स्, स्पर्धकांची रंगमंचासमोर प्रेक्षक व खेळाडूंची वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियोजन शिस्तबंध्द व्हावे याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

स्पर्धा आयोजन समिती मध्ये  मा. जयश्रीताई महाजन सोो. मा. महापौर ज.श.म.न.पा., मा.श्री. कुलभुषण पाटील सोो. उपमहापौर ज.श.म.न.पा. जळगांव, मा.श्री. सुनिलभाऊ महाजन, मा.श्री. कैलास घुले, मा.श्री. शरदभाऊ तायडे, मा.श्री. बाळासाहेब कंखरे, मा.श्री. विजय बांदल, मा. श्रीकांतशेठ खटोड, मा. श्री. मुकेशशेठ हासवानी, मा.श्री. राहुल सारवत, विलास यशवंते, राजेश लखोटे, आदि मान्यवर उपस्थीत असणार आहे.

बक्षिस वितरण समिती मध्ये  मा.पालकमंत्री ना.श्री. गुलाबरावजी पाटील, मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन, मा. श्री. संजयजी सावंत (मुंबई), मा.आ.श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राजकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन ठाणे, मा. ज्ञानेश्वर पाटील (आर.पी.एफ. इन्पेक्टर, जळगांव), रविंद्र वंजारी, शशांक सोनी, ईश्वर सोनार, योगेश जावळे, फिरोज खान गुलबाज खान, जावेद शाहा हकीम शाहा, रहीम शेख सारवत, चंदु कांबळे, मयुर सोनी, शैलेशभाऊ पाटील, जावेद बिल्डर (भडगांव), जावेद शेख (रावेर), नासीर शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.

Tags: bodibildingjalgaonjalgaon jilha ShreeSai bajarang jim
Previous Post

रेकॉर्डिग व्हायरल ; अन बकाले यांच्या मागे लागला ससेमिरा

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा वितरण सोहळा

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!