• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार गटातील बड्या नेत्याला खासदार अमोल कोल्हे यांची ऑफर, आमच्याकडे या…खासदार करतो

अजित पवार आणि शरद पवार गटात आता तीव्र टीकाटिप्पणी होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Team Rajmudra by Team Rajmudra
March 5, 2024
in Uncategorized
0
Spread the love

अहमदनगर (राजमुद्रा ) दि. 5 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. सर्वच जण दमदार लोकांसाठी आपल्या पक्षाची दारे उघडी करत आहेत. निवडणूक जिंकून देणाऱ्या व्यक्तींसाठी राजकीय पक्षांकडून पायघड्या घातल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार आणि शरद पवार गटात आता तीव्र टीकाटिप्पणी होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचवेळी अमोल कोल्हे अजित पवार यांच्या लोकांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न करत आहे.

अजित पवार गटातले आमदार निलेश लंके यांची शरद पवार यांच्यांशी जवळीक वाढू लागल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी खुली ऑफर दिली आहे. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेले या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याचं ऑफर दिलीय.

तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदार संघात लढण्याचा आवाहन अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना केले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलंय. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षि मध्ये वाजवलीच पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

निलेश लंके यांच्या सामाजिक कामाचा मला कायमच अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळजावर अभिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो, अशा भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्याय. तर या नाटकाने काय प्रेरणा दिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ता पुढे झुकत नाही आणि झुकणार नाही, असे कोल्हे यांनी म्हटलंय

Previous Post

केंद्रीय गृहमंत्री युवा संवाद सभेच्या माध्यमातून साधणार खान्देशातील युवकांशी संवाद

Next Post

जेलमध्ये टाकलं तर जेलमध्येही मोर्चा काढेन; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Next Post

जेलमध्ये टाकलं तर जेलमध्येही मोर्चा काढेन; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!