• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी आमचं राष्ट्रीय नेतृत्व,तरीही रक्षा खडसेंना आमची गरज नसेल तर…..आ.चंद्रकांत पाटलांचे सुचक वक्तव्य

Team Rajmudra by Team Rajmudra
April 12, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा)  :  – आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केले आहे. मात्र रक्षा खडसे  यांना माझी आवश्यकता नसेल तर समजून घ्यावे लागणार आहे, असे सूचक वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्याबाबत केले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मी मान्य केलंय 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी 100 वेळा सांगितलं आहे की, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मी मानतो आहे. त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. मात्र रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर समजून घेऊ. मी महायुतीचा घटक आहे. त्याप्रमाणे काम करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रक्षा खडसे यांना माझ्या मदतीची आवश्यकता नाही

खडसेंचे कुटुंब नेहमी माझ्या विरोधात बोलतात. त्या प्रकारे महायुतीतील घटक रक्षा खडसेही माझ्या विरोधात बोलायला लागल्या का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. रक्षा खडसे यांना माझ्या मदतीची आवश्यकता नाही. त्यांनी आधीच त्यांनी डिक्लेअर केले आहे की, मतदारसंघात खूप मोठा विकास केला आहे. खासदारांना असं वाटत असेल की यांची आम्हाला आवश्यकता नाही तर तेही आम्ही समजून घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश 

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनीच दिली आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तसेच जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी देखील याचा भाजपला फायदा होईल, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता जळगाव आणि रावेरमध्ये नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अबब, जिल्हाधिकारी यांनी घेतल्या तब्बल १२००बैठका…!

Next Post

कुलर मुळे,विजेचा धक्का लागुन १२ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

कुलर मुळे,विजेचा धक्का लागुन १२ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!