• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा दारुण पराभव

Team Rajmudra by Team Rajmudra
June 4, 2024
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई (राजमुद्रा) : –उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचा निकाला काय लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. कारण या मतदारसंघातून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात होते. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत. उज्ज्वल निकम यांना आतापर्यंत ३७०९९६ मते मिळाली आहेत तर वर्षा गायकवाड यांना ३५१७५६ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे. भाजपने यंदा पुनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जात होता. कारण येथून सुनिल दत्त हे प्रतिनिधीत्व करत होते. 2014 मध्ये सुनिल दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना येथून पराभव सहन करावा लागला होता.


उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यंदा 51.98 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा होती. मराठी मतदारांबरोबरच येथे दलीत आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या आहे. मुस्लीम मतदारही या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतात. शिवाय उत्तर भारतीय मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी येथे सभा घेतली होती. पण या मतदारसंघात चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार असल्याने विजय कुणाकडे जाणार अशी चर्चा होती. येथे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत होती.


या मतदारसंघात  विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दोन भाजपच्या ताब्यात आहेत तर २ शिवसेना शिंदेगटाकडे आहेत. शिवसेना ठाकरेंकडे एक आमदार आहे तर काँग्रेसकडे एक आमदार आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे महायुतीचे पारडे जड वाटत होते.

सुनिल दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त या दोन वेळा येथून विजयी झाल्या होत्या. पण 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. पुनम महाजन यांनी येथून विजय मिळवला. 2019 मध्ये ही पुनम महाजन विजयी झाल्या होत्या.

Previous Post

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात ही रामलल्ला कोपले;भाजपाची मोठी पिछेहाट

Next Post

चाळीसगाव मध्ये आ.मंगेश चव्हाणांना धक्का…. स्मिता वाघ यांना केवळ 16 हजारांच मताधिक्य?

Next Post

चाळीसगाव मध्ये आ.मंगेश चव्हाणांना धक्का.... स्मिता वाघ यांना केवळ 16 हजारांच मताधिक्य?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!