• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहराची पाण्याची चिंता मिटली ; आमदार राजू मामा भोळेकडून सपत्निक वाघूर धरणाचे जलपूजन

Team Rajmudra by Team Rajmudra
September 5, 2024
in जळगाव
0
जळगाव शहराची पाण्याची चिंता मिटली ; आमदार राजू मामा भोळेकडून सपत्निक वाघूर धरणाचे जलपूजन
Spread the love

राजमुद्रा : यंदा वरून राजाच्या कृपादृष्टीमुळे जळगाव शहरातील नागरिकांची दोन वर्षाची पाण्याची चिंता आता मिटली आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आमदार राजू मामा भोळे आणि त्यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.

याप्रसंगी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे.

यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Tags: jalgaon city
Previous Post

दीड लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी बीएचआरच्या अधिकाऱ्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीला आली स्वस्ताई : ग्राहकांचा उत्साह शिगेला

Next Post
गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीला आली स्वस्ताई : ग्राहकांचा उत्साह शिगेला

गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीला आली स्वस्ताई : ग्राहकांचा उत्साह शिगेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!