• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ; शिर्डी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचा धडाका

Team Rajmudra by Team Rajmudra
September 15, 2024
in राजकीय
0
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ; शिर्डी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचा धडाका
Spread the love

राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024)रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आताशिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिर्डी (Shirdi), छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दोन जाहीर सभा होणार असून यातून ते कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दौरा करत असलेल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेत बंडखोर झाली होती. ज्यात पैठण मतदारसंघात संदिपान भुमरे तर वैजापूर मतदारसंघात रमेश बोरणारे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. आता उद्धव ठाकरे पैठण आणि वैजापुरात येत असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभेच्या पूर्वीच ठाकरेंचा हा दौरा होत असल्याने ते कुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला रवाना होणार आहेत. 11 वाजता शिर्डी संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजून १५ मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ते वैजापूरहून पैठणला रवाना होणार आहेत. सव्वाचार वाजता त्यांचे पैठण येथे आगमन होणार आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरेंची दुसरी सभा होईल. यावेळी भाजपचे काही मोठे नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. या सभेत ते कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtrauddhav thackeray
Previous Post

विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

Next Post

भाजपला नंदुरबारमध्ये धक्का ; मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू विधानसभेच्या रिंगणात

Next Post
भाजपला नंदुरबारमध्ये धक्का ; मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू विधानसभेच्या रिंगणात

भाजपला नंदुरबारमध्ये धक्का ; मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू विधानसभेच्या रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!