• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवडीत विधानसभेच राजकारण बदलणार ; ठाकरेंकडून अजय चौधरी की सुधीर साळवी?

Team Rajmudra by Team Rajmudra
September 17, 2024
in राजकीय
0
शिवडीत विधानसभेच राजकारण बदलणार ; ठाकरेंकडून अजय चौधरी की सुधीर साळवी?
Spread the love

राजमुद्रा : विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असताना लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja Visarjan 2024) पायाशी ठेवलेली चिट्टी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आज मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना कोणीतरी गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आणून ठेवली आहे . या चिठ्ठीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरु झाली आहे.कारण लालबागचा परिसर हा शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. ठाकरे गटाचे अजय चौधरी (Ajay Chaudhari) हे सध्या शिवडीचे आमदार आहेत. मात्र, लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलेल्या चिठ्ठीत सुधीर साळवी (Sudhir Salvi) 2024 ला आमदार होऊ दे, असे लिहण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून विधानसभेत अजय चौधरी की सुधीर साळवी रिंगणात असणार हे पाहणे मंहत्वाचे ठरणार आहे.

शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजय चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्यामुळे लालबाग परिसरात सुधीर साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे पाहावे लागेल.

सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, शिवडीच विधानसभेचा राजकारण बदलणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtramukhyamantri uddhav thakre
Previous Post

आपचं ठरलं ;दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा महिलेच्या हाती

Next Post

उद्धव ठाकरेंसारखी हिंमत तुमच्यामध्ये आहे का? राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Next Post
उद्धव ठाकरेंसारखी हिंमत तुमच्यामध्ये आहे का? राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

उद्धव ठाकरेंसारखी हिंमत तुमच्यामध्ये आहे का? राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!