• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न,

आमदार मंगेश चव्हाण यांचे राजपूत समाज बांधवांकडून भरभरून कौतुक तर संकुचित विरोधकांचा केला निषेध.

Team Rajmudra by Team Rajmudra
October 9, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न,
Spread the love

राजमुद्रा :वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, गुजरात येथील भारतीय जनता पक्षाचे निते सुरेशजी मकवाना, महाराणा प्रताप ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजपूत समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

भारतातील एकमेव चित्तोडगढ येथील विजयस्तंभाची प्रतिकृती शहरात झाल्याने चाळीसगावकरांना आमदार चव्हाण यांनी सुखद धक्का देत विरोधकांना आपल्या विकास कामांचा जोरदार झटका दिला आहे. यावेळी लोकार्पण सोहळ्यात मंत्री महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याला साजेसा अतिशय सुंदर आणि देखणा चौक सुशोभित केल्याबद्दल आमदार चव्हाण यांचे कौतुक करत सर्व समाज बांधवाना लोकार्पण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. ४० ते ५० दिवसात हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचा इतका सुंदर चौक उभा केला आहे. वीर शिरोमणी हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे शौर्य, त्याग आणि निस्सीम देशप्रेम या स्मारकाच्या रूपाने चाळीसगावकरांना प्रेरणा देत राहील. हे स्मारक फक्त एक चौक नसून, चाळीसगावच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील एक स्फूर्तीदायी स्थान असेल अश्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. विरोधकांनी अशा ऐतिहासिक कामावर देखील टीका केली असून मोठ्या मनाने विरोधकांनी देखील चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे होती, मात्र टीका करत विरोधकांनी आपली संकुचित वृत्ती सिद्ध केल्याने उपस्थित सर्व महाराणा प्रेमी यांनी याचा तीव्र निषेध केला.

नुसत बोलबच्चन करून चालत नाही तर कृतीतून बदल घडत असतो – आमदार मंगेश चव्हाण

वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण पावसामुळे 10 दिवस उशिरा झाल्याने दिलगिरी व्यक्त करतो.मी वचननामा सादर करून एक दोन कामे करून फक्त खोटे आश्वासन देणारा आमदार नसून जे सांगितले ते प्रामाणिक पणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जे सांगितले नाही ती देखील कामे केली. या चौकाच्या लोकार्पणाचे माजी लोकप्रतिनिधी यांना आमंत्रण देऊन देखील ते आले नाही उलट आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्याएवजी त्यांनी हा चौक म्हणजे पाप आहे असे बेताल वक्तव्य केले. समस्त राजपूत समाज व महाराणा प्रेमी हा अपमान विसरणार नाही. माजी लोकप्रतिनिधी यांना माजीच ठेवण्याची काळजी समाज घेईल. मात्र मी एवढे सांगू इच्छितो की बोलबच्चन करून काम होत नाही त्यासाठी कृती करावी लागते आणि कृतीतून बदल घडत असतो. आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात, काटेरी बाबळीला नाही. जेवढे दगड माराल तेवढा विनम्र होईल. माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचे एवढे शिक्षण असून देखील सत्तेचा व सरकारचा योग्य वापर करता आला नाही. त्यांच्या काळात गाव गाव भकास केले आणि मी विकसित केले हा त्यांच्यातील आणि माझ्यातील फरक आहे, असे त्यांनी म्हटले..

Tags: jalgaonjalgaon citymaharashtraवीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा
Previous Post

सारांश फाऊंडेशन तर्फे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव

Next Post

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच ठिकाण बदललं ; शिंदेंचा बाण आझाद मैदानातून सुटणार

Next Post
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच ठिकाण बदललं ; शिंदेंचा बाण आझाद मैदानातून सुटणार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच ठिकाण बदललं ; शिंदेंचा बाण आझाद मैदानातून सुटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!