• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाजत गाजत, गुलाल उधळत या!’, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धडाकेबाज टिझर प्रदर्शित!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 9, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
वाजत गाजत, गुलाल उधळत या!’, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा धडाकेबाज टिझर प्रदर्शित!
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून धडाकेबाज टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून आज टीजर प्रदर्शित करण्यात आला. यात ‘वाजत गाजत, गुलाल उधळत या!’ असे आव्हान शिवसैनिकांना करण्यात आले आहे. या टीजरमध्ये सुरुवातीला फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्यासपीठावर उभा असलेला पाठमोरा फोटो पाहायला मिळतो. यात पुढे उद्धव ठाकरे म्हणतात, जर विरोधकांना वाटत असेल कि शिवसेना संपली, त्यांना मला दाखवायचे आहे शिवसेना काय करू शकते.” या टीजरबरोबर कॅप्शनमध्ये “वाजत गाजत, गुलाल उधळत या’ असे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा टिझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून या टीजरला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्विट करण्यात येत आहे. यंदाहि मुंबई महानगरपालिकेकडून उबाठा गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यंदाही दसरा मेळाव्याला शिवतीर्थवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे असणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

आज प्रसिद्ध केलेल्या टीजरमध्ये शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांचा माहोल दाखवण्यात आला असून “शिवगर्जना महाराष्ट्रहितासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी, ताकद निष्ठावंतांची, परंपरा करारी बाण्याची, शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची! वाजत गाजत, गुलाल उधळत या!” असे आवाहन टीजरमधून शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.. विधानसभेपूर्वी असणाऱ्या या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Tags: maharashtrashivsenauddhav thakre
Previous Post

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच ठिकाण बदललं ; शिंदेंचा बाण आझाद मैदानातून सुटणार

Next Post

अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के ; माजी मंत्री तुतारी हाती घेणार?

Next Post
अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के  ; माजी मंत्री तुतारी हाती घेणार?

अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के ; माजी मंत्री तुतारी हाती घेणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!