राजमुद्रा : मुंबईकडे जाणाऱ्या 12809 हावडा – मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा मेसेज रेल्वे विभागाला ट्विटर वरून आल्याने खळबळ उडाली आहे.ट्विटर वरून आलेल्या मेसेज नंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवून त्याची तपासणी करण्यात आली..
रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून पहाटे 4:17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 12809 हावडा – मुंबई मेल ही गाडी थांबवून गाडीतील प्रत्येक डब्बात जावून तपासणी करण्यात आली.
पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली….तब्बल 2 तास गाडीची पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली..