• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्रीपदावरून घमासान ; एकनाथ शिंदेंना झुकत माप घेण्याचा अमित शहांचा सल्ला

Team Rajmudra by Team Rajmudra
October 16, 2024
in राजकीय
0
मुख्यमंत्रीपदावरून  घमासान ; एकनाथ शिंदेंना झुकत माप घेण्याचा अमित शहांचा सल्ला
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल असतानाच आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून राजकारण रंगलं आहे. आगामी विधानसभेच्या अनुषंगाने महायुतीने बैठकांचा धडाका लावला आहे.. अशातच आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री पदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना दिलाय. त्यामुळे सध्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. यातील एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले की, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं मात्र तुमच्यामुळे आमच्या माणसांना त्याग करावा लागला..“शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाणार का दुसरा नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी असणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे..

दरम्यान अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 150-160 जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrejalgaon citymaharashtra
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ग्रा.पं. कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन संपन्न

Next Post

सस्पेन्स संपला ; प्रियंका गांधी वायनाडचा गड राखणार ?

Next Post
सस्पेन्स संपला ;  प्रियंका गांधी वायनाडचा गड राखणार ?

सस्पेन्स संपला ; प्रियंका गांधी वायनाडचा गड राखणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!