• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार ; ऐतिहासिक रॅलीसह शक्तिप्रदर्शन!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
आमदार मंगेश चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार ; ऐतिहासिक रॅलीसह शक्तिप्रदर्शन!
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.. उद्या 28 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी चाळीसगाव तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार असून पन्नास हजारांहून अधिक मतदारांच्या हजेरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हि निवडणूक आता फक्त माझी एकट्याची नाही तर ही निवडणूक आता नागरिकांनी डोक्यावर घेतली आहे. म्हणून या ऐतिहासिक दिवशी मित्रपक्ष, नागरिक सर्वांनी सहभागी होऊन या दिवसाचे साक्षीदार बनावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे देखील नियोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे तेथून पुढे जुने तहसील कार्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेश रोड तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे.

दरम्यान चाळीसगाव मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या हस्ते यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या नेत्यांची देखील यावेळी उपस्थीती असणार आहे. आ.चव्हाण यांनी प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई देखील त्यांच्या बरोबरीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आमदार चव्हाण यांच्या हिंगोणा गावातील नागरिकांनी तर सामुहिक शपथ घेऊन सगळं गाव चव्हाण यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Tags: bjpmaharashtraचाळीसगाव विधानसभा मतदारसंघा
Previous Post

तर राजू मामा “या” दिवशी भरणार उमेदवारी अर्ज ; शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा फौजफाटा..

Next Post

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

Next Post
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!