• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन अधिकृत उमेदवार

Team Rajmudra by Team Rajmudra
October 28, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज
Spread the love

राजमुद्रा : रावेर-यावल विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले अनिल छबिलदास चौधरी यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान संदेश देत आज शहरातील यशवंत विद्यालयासमोर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात रक्तदान करून त्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. मोठी मिरवणूक न काढता आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन न करता सामाजिक संदेश देत रक्तदान करून शेतकरी, दिव्यांग, कामगार, महिला, तरुण यांनासोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज रावेर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला.

रक्तदान शिबिर आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना गणेश बोरसे, इरफान शेख, अभिमन्यू चौधरी, दिलीप वाणी, तुकाराम बारी, शुभम पाटील, करीम मण्यार, दिलीप बंजारा, नंदकिशोर सोनवणे, पिंटू धांडे, योगेश निकम, भरत लिधुरे, राकेश भंगाळे, वसीम शेख, सचिन महाजन, सचिन झाल्टे, विकास पाटील, फिरोज शेख, हकीम खाटीक यांची उपस्थिती होती.

Tags: maharashtraअनिल छबिलदास चौधरीरावेर-यावल मतदार
Previous Post

भाजपाला धक्का : प्रभाकर गोटू यांना ठाकरे गटाची उमेदवारी

Next Post

रावेर विधानसभेसाठी अमोल जावळेचां अर्ज दाखल ; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंची प्रमुख उपस्थिती!

Next Post
रावेर विधानसभेसाठी अमोल जावळेचां अर्ज दाखल ; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंची प्रमुख उपस्थिती!

रावेर विधानसभेसाठी अमोल जावळेचां अर्ज दाखल ; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंची प्रमुख उपस्थिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!