• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव शहरातील ,वसंतवाडीत शरद पवार गटाला खिंडार ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

Team Rajmudra by Team Rajmudra
November 2, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
धरणगाव शहरातील ,वसंतवाडीत शरद पवार गटाला खिंडार ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
Spread the love

राजमुद्रा : शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात धरणगावातील संजय नगर व आई तुळजाभवानी नगर मधील तसेच जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथिल शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने पक्षाचे बळ वाढले असून “धनुष्यबाण हे फक्त एक चिन्ह नाही, तर एका लढाईचं प्रतीक आहे. धरणगाव व वसंतवाडी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारांसाठी हाती घेतलेलं धनुष्यबाण हे जनसेवेचं प्रतीक बनलं आहे.” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश समारंभावेळी बोलत होते.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील ग्रा. पं. सदस्य राजू चव्हाण, दशरथ चव्हाण, सरजून चव्हाण, राष्ट्रवादी शाखा प्रमुख प्रकाश चव्हाण, मिथुन चव्हाण, रविंद्र पवार, लक्ष्मण जाधव, भगवान चव्हाण , अर्जुन चव्हाण, रंजीत राठोड़ , भाईदास चव्हाण, सुनील चव्हाण, राजेश चव्हाण, रमेश राठोड़, शालेय समिती अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर धरणगावच्या संजय नगर येथील दीपक महाजन उर्फ भुरा महाजन, भैय्या महाजन, मच्छिंद्र चौधरी, सागर गायकवाड तसेच आई तुळजाभवानी नगर येथील आदिवासी मित्र मंडळाचे कार्यकर्ते विजय मालचे, सावण अहिरे, शंकर ठाकरे, देवा मोरे, शिवा मोरे, राकेश सोनवणे, गोपाल मालचे, तुषार मालचे, विनोद मालचे, देवराम पवार, शिवा पवार, दीपक मालचे, विक्की अहिरे, मानसिंग (छोटू) अहिरे, किरण सोनवणे, किरण सूर्यवंशी, संतोष शेमले, राहुल शेमले, सुनील शेमले, ओंकार ठाकरे, भटू मालचे, प्रशांत मालचे, अजय ठाकरे, गणेश सोनवणे, मंगला सोनवणे, आनंदा सोनवणे, रमेश बारीला, सुनील बारेला आणि विलास भिल यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेवून उमेदवार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

या प्रसंगी धरणगाव तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, नगरपरिषदेचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक सुरेश महाजन, शहर प्रमुख विलास महाजन, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, उद्योगपती वाल्मीक पाटील आणि उप तालुका प्रमुख संजय चौधरी ,जळगाव तालुक्यातील तालुका प्रमुख शिवराज पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपतालुका प्रमुख जितू पाटील, जिल्हा उपप्रमुख अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल यांची प्रमुख उपस्थित होती.

Tags: #cm eknath shindejalgaonmaharashtra
Previous Post

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश.

Next Post

अब्दुल सतारांचं टेन्शन वाढलं : उमेदवारी राहणार की रद्द होणार?

Next Post
अब्दुल सतारांचं टेन्शन वाढलं : उमेदवारी राहणार की रद्द होणार?

अब्दुल सतारांचं टेन्शन वाढलं : उमेदवारी राहणार की रद्द होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!