• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मातृदिन – एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहचणारा मार्ग – संत राजिंदर सिंहजी महाराज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 9, 2021
in Uncategorized
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) दर वर्षीचा इंग्रजी मे महिन्याच्या दुसरा रविवारी म्हणजे जागतिक मातृदिन (मदर्सडे). हा दिवस जगभरातल्या मातांचा सन्मान करण्यासाठी विश्वभरात साजरा केला जातो. आई आणि मुलांच्या नात्यामधलं पावित्र्य ही विश्वातील एकमेव शाश्वत गोष्ट म्हटली तरी वावगे ठरणार नाही.

आपण आपल्या जीवनातील उदाहरण घेतले असता, आपल्याला कळून येते की संसारिक प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम आदर्श म्हणजे आई आणि मुलांमधील प्रेम आहे. आपण बघतो की लहान मूल कसे आपल्या आईचे केस ओढते, तिला त्रास देते प्रसंगी मारतेही तरीही त्याच्या अशा कृतीचा आईला राग येत नाही. जर मल-मुत्राने माखलेले मुल तिच्याकडे आले तर प्रथम ती त्याला स्वच्छ करते, स्वच्छ कपडे परिधान करते आणि मायेने जवळ घेत मिठी मारते. आईचे मुलांप्रतीचे प्रेम म्हणजे एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहचणारा मार्ग होय. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये लोभाला कोणतेही स्थान नाही.

आई आपल्या मुलासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत असते. स्वतःच्या घासातील घास काढून ती आपल्या बाळाला भरविते. त्याचप्रमाणे, बाळाला उब मिळावी म्हणून ती स्वतःचे वस्त्र त्याच्या भोवती लपेटते. आपल्या मुलासाठी करीत असलेल्या तिच्या त्यागाला आणि बलिदानाला अंत नाही. ह्या पवित्र नात्यात, आई मुलाच्या प्रेमाशिवाय, या जगातील इतर नाते संबंधातील प्रेमही ती सोडून द्यायला तयार होते इतकी या नात्यातील जवळीकता श्रेष्ठ आहे. जेव्हा मुल तिच्या कुशीत असते तेव्हा ती सर्वकाही विसरुन जाते व केवळ आपल्या मुलाच्या प्रेमात मग्न रहाते. या नात्यात, आई स्वतःला विसरते व आपल्या मुलाच्या इच्छापूर्ती करता स्वतःच्या इच्छांचा देखील त्याग निस्वार्थपणे करते.

आपल्याला माहित आहे की आईचे तिच्या मुलावर असलेले प्रेम हे नाजूक व हृदयस्पर्शी असते. हे ऐहिक प्रेमाचे शुद्ध रूप आहे जे स्वार्थापासून पूर्णपणे मुक्त आहे. याच बरोबर मुलांनी सुद्धा हे जाणलं पाहिजे व समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या आईने कशा प्रकारे त्यांची सेवा केली आणि त्यांच्या आरामासाठी तसेच सुखसोयीसाठी किती त्याग केलेला आहे. जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्या आईसाठी काय करावे हे सुनिश्चित केले पाहिजे. आपण आईचा मान राखून तिच्यावर प्रेम करुन असं नक्कीच करू शकतो. आपल्यासाठी तिने प्रेमाने केलेल्या सर्व गोष्टीं व प्रयत्नांचा अंतःकरणापासून स्वीकार करायला हवा.

अशाच प्रकारे असे म्हटले जाते की संत-सद्गुरूंचे आपल्या शिष्यावरचे प्रेम हे हजारो मातांच्या प्रेमापेक्षा ही मोठे असते. सर्वशक्तिमान पिता-परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतात. संत-सद्गुरू आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, ते तर केवळ आपल्याला देण्यासाठीच येतात. ते नेहमीच आपल्याला अंतःकरणात जाऊन परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी प्रेरित करतात.

आपण आजच्या मदर्स-डे वर अर्थात मातृदिनी वचन देवू या, प्रतिज्ञा करूया की आईच्या निस्वार्थ प्रेमाचे स्मरण फक्त मातृ दिनी न करता, आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव वृद्धिंगत करूया. आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव जपूया, त्याची कदर करूया. पिता-परमेश्वरा चे देखील आपण आभार मानू या, की त्यांनी आपल्याला मानवी जीवनाची एक सुवर्ण संधी दिली आहे. अगणित आशिर्वादांसाठी आणि अनंत प्रेमा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण आपले जीवन प्रेमाने, सदाचाराने जगावे. ध्यान-धारणेला वेळ देऊन, अध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करावी.

Tags: matrudinmother's dayrajmudrasant rajendarsingh
Previous Post

म्युकरमायकोसिसचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्याची मुनगंटीवार यांची मागणी

Next Post

अमरावती, वाशीम, अकोला, सिंधुदुर्गात आजपासून कडक लॉकडाऊन

Next Post

अमरावती, वाशीम, अकोला, सिंधुदुर्गात आजपासून कडक लॉकडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!