• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदेशी मद्याचा साठा जप्त

धडक कारवाई एक कोटीचा मुद्देमाल ताब्यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 13, 2021
in क्राईम, जळगाव
0
विदेशी मद्याचा साठा जप्त
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेला लाखो रुपयांचा अवैध विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी शिवारात रविवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगावच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. त्यात लाखो रुपयांचे विदेशी मद्याच्या साठ्यासह एक ट्रक असा सुमारे एक कोटी रुपयाचा माल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील लाखो रुपयाच्या विदेशी मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांनी तात्काळ नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगाव येथील पथकांना सतर्क करून सापळा रचण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर चाळीसगाव, औरंगाबाद रस्त्यावर सांगवी शिवारात बोढरे फाट्याजवळ पथके थांबली होती.

रविवारी रात्री उशिरा MP 09 HG 9354 क्रमांकाचा एक ट्रक त्या ठिकाणी आला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पथकाने याप्रकरणी ट्रक चालक अजय कन्हैयालाल यादव (वय ४१) रा. इंदूर, मध्य प्रदेश याला अटक केली आहे. दरम्यान या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे १ कोटी ३ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेली रॉयल ब्लू मॉल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीलीटरच्या ६० हजार ४८० बाटल्या मद्य ठेवण्यासाठी असलेले सहा प्लायवुडचे खोके, चालकाचा मोबाईल फोन तसेच टाटा कंपनीचा ट्रकचा समावेश आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: amlneravaidh darubodhare fatachalisgaonjalgaonmalegaonrajya utpadan shulk
Previous Post

मनपाच्या चारही प्रभाग समितींवर अखेर बंडखोरांचे वर्चस्व

Next Post

रावेरात नकली नोटांचे रॅकेट पोलिसांकडून उघड, पाच ताब्यात

Next Post

रावेरात नकली नोटांचे रॅकेट पोलिसांकडून उघड, पाच ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!