• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय २२ जुलैपासून ‘नॉन कोविड’ घोषित

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 19, 2021
in जळगाव
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय २२ जुलैपासून ‘नॉन कोविड’ घोषित
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) खुले करावे असा लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवला होता. त्यावर विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ जुलै २०२१ पासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. तर कोरोना महामारीच्या रुग्णांना मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात उपचार होतील.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नॉन कोविड सुविधा पूर्ववत सुरु करण्याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ कळवावे असे पत्र अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवले होते. त्यानुसार शनिवारी १७ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महाविद्यालयीन परिषदेची बैठक घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली साधकबाधक चर्चा होऊन सर्व विभागप्रमुखानी एकमताने रुग्णालय हे कोरोनाविरहित रुग्णांसाठी खुले करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला.

तसेच कोरोना आजाराच्या रुग्णांना मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात उपचार व्हावेत, तेथील आयसीयू विभागात आवश्यकता भासल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे तज्ञ डॉक्टर पाठवू, मोहाडी रुग्णालयात जागा शिल्लक नसेल तरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्याविषयी विचार व्हावा, कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरु राहतील, असा लेखी अभिप्राय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी यांना दिला होता.

या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी १९ जुलै रोजी ‘नॉन कोविड’ करण्याविषयी आदेश काढले आहेत. त्यानुसार सौम्य व मध्यम कोरोनाबाधित रुग्णांवर मोहाडी येथील रुग्णालयात तर गंभीर रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात मोहाडी येथील अतिदक्षता विभाग सुरु होईपर्यंत उपचार होतील. तर कोरोना नसलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सी २ या कक्षातच उपचार सुरु राहतील.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व वयोगटांसाठी अतिदक्षता विभाग, साधारण असे सर्व मिळून ३८६ ऑक्सिजन खाटा आहेत. तसेच मोहाडी स्त्री रुग्णालयात ५०० ऑक्सिजन खाटा तर अतिदक्षता विभागात १५ खाटा आहेत.

Tags: abhijit raut jalgaonGMCjalgaonjayprakash ramanandnon covidstri rugnalaya
Previous Post

भुसावळ चे आमदार संजय सावकारे यांची सोशल मीडियावर बदनामी

Next Post

पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

Next Post
पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!